कोरोनाचा कहर, मात्र पुढाऱ्यांकडूनकरोना नियम पायदळी

रांजणगाव गणपती:- शिरुर तालुक्यात सध्या करोनाचा कहर वाढत असुन सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे ७०० तर शहरात १०० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. शासनाने घालुन दिलेल्या नियमांची राजकिय पुढाऱ्यांकडुन वेळोवेळी पायदळी तुडवले जात आहेत. परंतु सर्वसामान्य लोकांकडुन दंड वसुली करणारे पोलीस मात्र गर्दी जमवत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर कारवाईचे धाडस दाखविणार का...? असा प्रश्न उपस्थित होत


आहे. सध्या सगळीकडेच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गावोगावी क्रिकेट स्पर्धा, वाढदिवस तसेच राजकीय कार्यक्रम मोठया प्रमाणावर आयोजित केले जात आहेत. तसेच राजकीय कार्यक्रमात अनेकवेळा लोक मास्क सुद्धा लावत नसुन त्यामुळे करोनाचा फैलाव मोठया प्रमाणावर होत आहे.

चौकट
राजकीय नेत्यांवर कारवाई का नाही...?
शिरुर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस मोठया प्रमाणावर साजरे केले जात आहेत. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन मोठया प्रमाणावर गर्दी जमविली जात असताना पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत असुन सर्वसामान्य लोकांनी मात्र मास्क न लावल्यास त्यांच्याकडुन सक्तीने दंड वसुली केली जात आहे. त्यामुळे करोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना वेगळे नियम आहेत का...? असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

शिरुर तालुक्यातील पुढाऱ्यांचे दुर्लक्ष...

 तालुक्यातील एका गावात एका महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असुन त्यातील काहीआरोपींना अटक करण्यात आलेली आहे. परंतु हि घटना घडून आठ दिवस उलटूनही राजकीय नेत्यांनी या पीडित कुटुंबातील व्यक्तींची साधी विचारपूसही केलेली नाही. पीडित कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असुन नुकताच या गटातील जिल्हा परिषद सदस्याचा वाढदिवस मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त हे जिल्हा परिषद सदस्य शेजारच्या गावात येऊन क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन करुन गेले. मात्र शेजारच्या गावात असलेल्या पीडित कुटुंबातील व्यक्तीची  भेट घेण्यास मात्र ते विसरले. त्यामुळे राजकीय पुढारी हे फक्त आमचा मतदानासाठी वापर करतात. 

कोट:-
तृप्ती देसाई यांनी शिरुर तालुक्यातील या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करत हा खटला फास्टट्रक कोर्टात चालविण्याची मागणी करत आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. परंतु शिरुर तालुक्यातील पुढारी मात्र स्वतःचे वाढदिवस करण्यात मशगुल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या