सिगारेट उधार न दिल्याचा राग, दारुच्या नशेत दुकानदाराचा खून


रात्रीच्या अंधारात भयंकर कृत्य

बिहारमधील  दानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माथेफीरूने तर भयानक कृत्य केले आहे. उधार सिगारेट दिली नाही म्हणून या माथे फिरून सिगारेट विक्रेत्याची गोळ्या झाडून चक्कहत्या केली आहे.

पटणा : असं म्हणतात की कोणतेही व्यसन वाईटच असते. व्यसन मर्यादेच्या पलीकडे केले तर त्याचे दुष्परिणाम निश्चितच दिसतात. आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी काही लोक टोकाचे निर्णय घेतात. बिहारमधील दानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माथेफीरूने तर भयानक कृत्य केले आहे. उधार सिगारेट  दिली नाही म्हणून या माथेफिरूने सिगारेट विक्रेत्याची गोळ्या झाडून चक्क हत्या केली आहे. आरोपीचे नाव सुजित कुमार असून त्याने दारुच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तर पंकज साव असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर दानापूर भागात एकच खळबळ उडाली आहे. फक्त एका सिगारेटसाठी चक्क खून केल्यामुळे आश्चर्यदेखील व्यक्त केलं जातंय.मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री म्हणजेच 26 जानेवारी रोजी आरोपी सुजित कुमार रात्री उशिरा आपल्या घरी जात होता. यावेळी तो सिगारेटच्या दुकानावर आला. दुकानामध्ये विक्रांत कुमार नावाचा तरुण बसला होता. सुजित कुमारने विक्रांत कुमारसोबत सिगारेटच्या मुद्द्यावरुन वाद घालणे सुरु केले. या दोघांमध्ये वाद वाढत गेल्यामुळे नंतर त्यांच्यात मारामारी सुरु झाली. याच काळात विक्रांत कुमारचा भाऊ पंकज साव घटनास्थळी दाखल झाला. त्याने दोघांनाही सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच येथे जास्त वेळ थांबला तर वाद वाढेल असे सांगून पंकजने सुजित याला घरी पाठवले. मात्र, राग अनावर झाल्यामुळे सुजितने घरातून बंदूक आणली. तसेच कशाचाही विचार न करता त्याने थेट पंकजवर गोळ्या झाडल्या. तसेच गोळी मारून आरोपी फरार झाला.

यापूर्वी दोघात झाला होता वाद 

ही घटना घडल्यानंतर पंजकच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. तसेच पंकजला रुग्णालयात दाखल केले. मात्र पंकज घटनास्थळीच मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर पंकजचा भाऊ विक्रांत कुमारने सविस्तर माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी सुजित आणि पंकज यांच्यात उधार देण्यावरुन वाद झाला होता. यावेळी पंकजने सुजितला धमकी दिली होती. याच रागातून नंतर पंकजने सुजितची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या