मुख्यमंत्री ऑन फिल्डच

ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्यांना काय करावं



पुणे :
महाविकास आघाडीचे सरकारं हे गेंड्याच्या कातडीच सरकार आहे अशी टीका भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या टीकेला निलम गोऱ्हेंने प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री ऑन फिल्डच आहेत. ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावं. जनतेच्या मनात मुख्यमंत्री जोडले गेलेत विरोधकांची दृष्टी अधू झालीये. चंद्रकांत दादांना एखादं उपमाचं पुस्तक आणून द्यावं असे निलम गोऱ्हेंने म्हटले आहे.

गड- किल्ल्यांवर पुजास्थान विकसित करणार
शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या मृत्यूपूर्वी गडकिल्ल्यांवरील मंदिर विकसित करण्याचं मागणी केली होती. त्यानुसार राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्यांवर देवळं ,पुजास्थान विकसित करण्याची मागणी करणारअसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. येत्या दिवसात यादी तयार करण्याचे आदेश इतिहास तज्ञांना दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गडकिल्ल्यांबरोबरचं मंदिराचाही विकास राज्य सरकार करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
शाळा सुरु करण्याचा आग्रह करू नये
कोरोनामुळे शहरातील शाळा बंद करण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केला आहे. गोऱ्हे लहान मुलांच्या शाळा सुरु करण्याचा आग्रह धरू नका असे म्हटले आहे. कोरोना व ओमिक्रॉन वाढत्या रुग्णसंख्येचा लहान मुलांनाही धोका वाढला असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. काही गोष्टी नाविलाजाने सरकारला कराव्या लागल्यात. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणू नये. मुलं बाधित झाली तर त्यांच्या जीवाला त्रास होईल आणखी मुल बाधित होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं माझ पालक संघटना यांना आवाहन आहे, की त्यांनी शाळा सुरु करण्याचा आग्रह करू नये असे त्यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या