समाजाचे दुःख कमी करण्याचे काम पत्रकार करतात : महंत भास्करगिरी महाराज


शेवगाव : 
पत्रकारिता करत असताना पत्रकारांना अनेक अडचणींना तसेच अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागते, शाही लोकांच्या आमिषाला बळी न पडता लोकशाही बळकट करण्याचे काम आज पत्रकारांच्या माध्यमातून होत असते. पत्रकार हे आपल्या लेखणीतुन समाजाच्या विविध प्रश्नावर वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम हे पत्रकार करत असून समाजाचे दुःख कमी करण्याचे काम पत्रकार हे करत असतात, असे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत भास्करगिरी महाराज यांनी केले. शेवगाव येथे बुधवार दि. १९ जानेवारी २०२२ रोजी शेवगाव येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दर्पण दिन व पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत भास्करगिरी महाराज हे बोलत होते. तर पुरस्कार वितरण सोहळा हा दैनिक लोकमतचे अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार भूषण पुरस्कार हा अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजीराव शिर्के यांना देण्यात आला. याप्रसंगी संत जोग महाराज संस्कार केद्राचे गुरुवर्य ह.भ.प राम महाराज झिजुर्के,जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री दत्ताजी पाचपुते, शेवगाव तालुका अध्यक्ष श्री दादासाहेब डोंगरे, महिला पत्रकार तारामती दिवटे, श्रीमती सातपुते ताई, ह.भ.प. चंद्रकांत महाराज लबडे यांच्या सह आदी हे मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी पत्रकार भूषण पुरस्काराने शिवाजीराव शिर्के, कला भूषण पुरस्काराने सुरेश तेलोरे, क्रीडा भूषण पुरस्काराने किरण वाघ, एव्हरेस्टवीर पुरस्काराने अविनाश बावणे, साहित्य भूषण पुरस्काराने रमेश भारदे यांच्या सह आदींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, संजय नांगरे, दारूबंदी समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल घोलप, ऍड सुभाष लांडे, बाळासाहेब मुरदारे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फुलचंद अण्णा रोकडे, संदीप भगत सर्वश्री, पत्रकार राजेंद्र सावंत, शामराव पुरोहित, रेवणनाथ नजन, सुरेश पाटील, उमेश घेवरीकर, जनार्धन लांडे,  अनिल साठे, इसाक शेख, रावसाहेब निकाळजे, अविनाश देशमुख, सुभाष बुधवंत, रावसाहेब मरकड, बाळासाहेब धस, किरण तहकीक, रामनाथ रूईकर, लक्ष्मण झिजुर्डे, जयप्रकाश बागडे, पांडुरंग निंबाळकर, निजाम पटेल, युसूफ शेख, यांच्या सह शेवगाव-पाथर्डीचे पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्टू राज्य मराठी पत्रकार संघ पाथर्डी अध्यक्ष  अविनाश मंत्री यांनी केले तर सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर आभार पत्रकार रेवणनाथ नजन यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या