मुंबई- पुणे द्रुतगतीमार्गावर रोज अकरा हजार वाहने टोल न देता जातात

 


पुणे:
  २०१६ साली मी मुख्य माहिती आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीवरून मुख्य माहिती आयुक्तांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोल नाक्यांवरून रोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात ती संख्या व टोलची रक्कम याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. नुकतीच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरून प्रवास करत असल्याचे दिसून येते. डिसेंबर २०२१ या पूर्ण महिन्यात एकूण ३,३०,७९७ वाहनांनी टोल न भरता या महामार्गावरून प्रवास केला. यात exempt आणि violators अशा दोन कॅटेगरी मधील वाहने असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र यातील exempt किती व violators किती याचा तपशील मात्र जाणीवपूर्वक प्रसिद्ध केलेला नाही असा संशय येतो. मुळातच रोज दहा हजारांहून अधिक रुग्णवाहिका ,  पोलिस, मिलिटरी वाहने , आमदार, खासदार वगैरे या रस्त्यावर प्रवास करत असतील ही शक्यता शून्य आहे.  याचाच अर्थ रोज काही हजार वाहने टोल चुकवून जातात. हे केवळ अशक्य आहे हे या रस्त्यावर प्रवास करणारे लहान पोर ही सांगू शकेल. त्यामुळे हे सगळंच संशयास्पद वाटते. मात्र कंत्राटदाराकडून आलेली ही आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना तेथील आधिकाऱ्यांना यात काही वावगं वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे. 

     काही सदरात टोल चुकवून वाहने जाण्याच्या संशयास्पद प्रकाराला जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची चौकशी करावी. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या