Breaking News

दर्शनासाठी चाललेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

निरगुडसर  :  श्री क्षेत्र थापलिंग येथे देवदर्शनासाठी रिक्षात बसून जाणाऱ्या महिलेच्या ८० हजार रुपये किमतीचे गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी महिला दि.१७ रोजी कुटूंबासमवेत अवसरी बुद्रुक या ठिकाणावरून त्याची रिक्षा एम एच १० एस ८२०० यात बसून निरगुडसर मार्गे थापलिंग या ठिकाणी देव दर्शनासाठी निघाले होती. रिक्षात बसून जाताना फिर्यादी महिला ही रिक्षाच्या दरवाजात बसली होती .रिक्षा निरगुडसर गावच्या हद्दीत निरगुडसर फाटा येथे आली असता त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागून आलेल्या मोटर सायकलवरील आलेल्या तीन चोरट्यापैकी मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र ओढून चोरून नेले आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

No comments