भारताचे डॉ. परदेशी बनले दुबईच्या क्रिकेट बोर्डाचे हेड फिजिओथेरेपिस्ट

 भारताच्या डॉ.मनिष परदेशी यांची दुबई (UAE) क्रिकेट बोर्डच्या हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्ट पदी निवड



पुणे : 


येथील डॉ.मनिष दिपक परदेशी यांची दुबई (UAE)च्या इमिरेट्स  क्रिकेट बोर्ड  च्या हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्टपदी निवड झाली आहे. 

विशेष म्हणजे पहिल्यांदाच भारतातून अश्या प्रकारे निवड होणारे डॉ.मनीष परदेशी हे प्रथमच फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर आहेत.

डॉ.मनिष परदेशी यांना सुरुवाती पासूनच क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंचे आरोग्य या विषयाची त्यांना विशेष आवड होती. वडिल दिपक परदेशी हे रिक्षा चालक असल्याने डॉ.मनिष यांनी आपले शिक्षण अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पूर्ण केले.शिक्षणाची आवड असणाऱ्या  डॉ.मनीष यांनी फिजिओ थेरपीमधील पदवीचे शिक्षण पुणे येथील मॉडर्न कॉलेजमधून पूर्ण केले. आपले पुढील पदव्युत्तर शिक्षण पंजाबमधील गुरुनानक देव विद्यापीठ, अमतृसर येथून पुर्ण केले.

       भारतीय फुटबॉल संघ,भारतीय कबड्डी संघ,19 वर्षाखालील भारतीय बॅडमिंटन संघ , प्रो कब्बडी लिग मधील पटना पँथर्स संघ, युपी योद्धा संघ, प्रो बॅडमिंटन लीग मधील नॉर्थ - इस्ट वॉरियर्स संघ,  आदींसोबत  यापूर्वी  त्यांनी हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्ट म्हणून उत्तम सेवा बजावली आहे. 

 दरम्यान, डॉ.मनिष दिपक परदेशी यांची दुबई (UAE)च्या इमिरेट्स क्रिकेट बोर्ड  हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्ट पदी निवड करण्यात आली असून ते पुढील कार्यभर सांभाळण्यासाठी दुबई येथे रवाना झाले आहेत.

  भारतातून झालेल्या या विशेष निवडीबद्दल डॉ.मनिष परदेशी यांच्या वर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या