Breaking News

विराटच्या जागी ऋषभ पंतला कसोटी संघाचं कॅप्टन बनवा – सुनील गावस्कर

 


मुंबई: विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर अत्यंत स्फोटक विधान करणारे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी पुढचा टेस्ट कॅप्टन कोण असावा? या बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. विराटच्या जागी कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी ऋषभ पंत  योग्य उमेदवार आहे, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. विराटने काल अचानक कसोटी संघाच्या कॅप्टनशिपचा राजीनामा देऊन क्रिकेट जगताला धक्का दिला. विराटच्या जागी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी ऋषभ पंत योग्य पर्याय आहे, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.

No comments