भर दुपारी पेटवल्या शेकोट्या




बीड :
 शहर व तालुक्याने धुक्याची चादर पांघरली असून रविवारी  दुपार झाली तरी अंगातील हुडहुडी जात नव्हती. शहरातच महाबळेश्वरचा  अनुभव येऊ लागला आहे.
सुर्यदर्शन न झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे नागरिकांनी भर दुपारी शेकोट्या पेटवल्या आहेत. शहर व तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून शीतलहरी वाहत आहेत. यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. दोन दिवसांपासून पूर्णवेळ सुर्यदर्शन होत नसल्याने हुडहुडीत वाढ झाली असून शहर  व परिसरात फिरताना थंड हवेच्या ठिकाणी गेल्याचा भास होत आहे. शनिवारी (ता.१५) थोडा वेळासाठी सुर्यदर्शन झाले होते. पण रविवारी तर सुर्यदर्शन झालेच नाही. यामुळे भर दुपारी थंड वाऱ्यामुळे  हुडहुडी भरली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या