डॉ. शिंदे यांना न्यायालयीन कोठडीत अमानवी वागणूक

 नगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरण


पुणे : नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड आय सी. यू. मध्ये आग लागण्यामध्ये कोणताही दोष नसताना डॉ विशाखा शिंदे यांना बेकायदेशीर रित्या अटक करण्यात आली. त्याचबरोबर पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत  अमानवी वागणूक मिळाली असून त्याचा निषेध करतो. तसेच त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करावा, अशी मागणी डॉ. राजीव जोशी व डॉ. प्राची साठे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

कोव्हिड वॉरियर डॉ. विशाखा शिंदे या अपघाताला जबाबदार नव्हत्या. त्यांना आग विझवण्याचे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. त्यांना पोलिस कोठडीत आणि न्यायालयीन कोठडीत अमानवी वागणूक देण्यात आली आणि त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली करण्यात आली. जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे लागलेल्या आगीबद्दल तपास करण्यासाठी तीन सदस्य नेमलेल्या समितीचा अहवाल आलेला असून या  तपासणीचा अहवाल गोपनीय ठेऊन सरकार काय लपवत आहे हे कळत नसल्याचे डॉ साठे यांनी यावेळी सांगितले.

 स्वतःच्या जिवाची बाजी लावून रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे संरक्षण कोणीही करत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी स्वतःच्या हक्कांसाठी लढायला हवे. त्याचबरोबर पुढील काळात वैद्यकीय उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होणार नाहीत, असा इशारा ही डॉ. राजीव जोशी यांनी यावेळी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या