ना.थोरातांकडून निमोन पाणीपुरवठा योजनेची पाहणी


संगमनेर  :


 परिसरातील निमोन, क-हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांसाठी ना. बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून या कामाची पाहणी आज भोजापूर धरणावर जाऊन महसूलमंत्री नामदार थोरात यांनी केली आहे.

चास खोऱ्यातील भोजापूर धरणावरून होणाऱ्या या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाणी नामदार थोरात यांनी केली. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, आर्किटेक्चर बी.आर.चकोर, बंडूनाना भाबड, सुभाष सांगळे, अनिल सांगळे, अनील घुगे, रोहिदास सानप, ज्ञानेश्वर सांगळे, गंगाधर जायभाये, दगडू आप्पा घुगे, भारतशेठ मुंगसे, संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे , सिन्नरच्या प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांसह पाच गावातील सरपंच उपसरपंच व प्रतिनिधी हजर होते.

निमोन सह क-हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांना भोजापूर धरणातून पंधरा किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन मधून थेट ग्रॅव्हिटी द्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या