विज क्षेत्रातील नवीन बदल समजून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण : ऊर्जामंत्री यांचे निर्देश




मुंबई : विज क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन बदलांस तसेच आव्हानांना सामोरे जाण्याकरीता तिन्ही वीज कंपन्यांतील मनुष्यबळाला अद्ययावत व प्रशिक्षित करण्यासाठी  अत्याधुनिक प्रशिक्षण,  संशोधन व विकास केंद्र निर्माण करण्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी मानव संसाधन विभागाला आदेश दिले आहेत.
 राज्याची उपराजधानी नागपूर येथे एक अद्ययावत आणि सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करावे असे निर्देश त्यांनी नुकतेच झालेल्या मानव संसाधन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये दिले. यात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ऊर्जा विभागांतर्गत एकूण ८५,००० अभियंते, अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या गुणात्मक विकासाकरीता अद्ययावत तसेच सर्व सोईनी सुसज्ज असे प्रशिक्षण तथा संशोधन व विकास केंद्र निर्माण करून त्यांच्या सेवाकाळात नव नवीन तंत्रज्ञान याचे प्रशिक्षण देऊन  राज्याच्या व त्या अनुषंगाने देशाच्या विकासात हातभार लागेल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.
ऊर्जा क्षेत्रामध्ये वेगाने होणा-या घडामोडी पाहता त्यातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांच्यातील कौशल्य विकासाची गरज ओळखून त्यांच्या प्रशिक्षणाची व्याप्ती आणि दर्जावर भर देऊन त्यामध्ये भरीव वाढ करण्याचे निर्देश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या