Breaking News

पुन्हा मोठा घोटाळा, औरंगाबादेत नियमांना डावलून नियुक्त्या, भरती प्रक्रियेत गोंधळ औरंगाबाद : राज्यात मागील काही दिवसांपासून भरती परीक्षेतील वेगवेगळे घोटाळे समोर येत आहेत. या घोटाळ्यांमुळे सरकारी नोकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुण-तरुणींच्या स्वप्नांना सुरुंग लागत असून सरकारवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, राज्यात आणखी एक भरती प्रक्रियेतील घोटाळा उघड झाला आहे. औरंगाबादेत मृदा आणि जलसंधारण खात्यातील तब्बल 85 पदांच्या भरतीदरम्यान नियमांना फाटा देण्यात आला आहे. येथे मुलाखती न घेता अपात्र आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

No comments