एक लाख रुपयाचा विमा… खड्ड्यांच्या प्रश्नावर अनोखे आंदोलन !

पुणे 


पुणे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जागी रस्ते खचल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ ली असल्याने शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्यावतीने अभिनव पध्दतीने आंदोलन करण्यात आले. खड्यांमुळे वाहनचालकांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने एक लाखांचा विमा काढुन देण्यात आला आहे. शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्यावतीने  शिवाजी रोडवरील गाडीखाना हॉस्पिटलसमोर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, शहर समन्वयक राजेंद्र शिंदे, असंघटीत कामगार सेनेचे अनंत घरत, विभागप्रमुख नितीन परदेशी, संघटक नंदू येवले, युवासेनेचे युवराज पारिख, सनी गवते, संतोष भूतकर, नागेश खडके, अमोल हुलावळे, नितीन रावळेकर, दिनेश दाभोळकर, निलेश जगताप, प्रशांत पैलवान, रमेश क्षिरसागर, राजेश मोरे, हर्षद मालुसरे, गनी पठाण, राजेंद्र अबनावे, बकुळ डाकवे उपस्थित होते.

बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असुन शहरात निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजप केवळ टेंडर काढून कमिशन गोळा करण्यात व्यस्त आहे. शहरातील अनेक भागांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी अथवा केबल टाकण्यासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी महापालिकेकडून खोदकाम करण्यात आले. मात्र त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात डागडूजी केल्यामुळे शहरातील अनेक रस्ते खचले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होणे हि नित्याचीच बाब झाली आहे. बहुतांशी ठिकाणी खड्डा बुजविताना थेट माती टाकून खड्डा बुजविला आहे. तरकाही ठिकाणी खडी न टाकता थेट काँक्रीट टाकले जात आहे. प्रसंगी त्याच ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे शहर शिवसेनेच्यावतीने वाहचालकांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक आधार म्हणून एक लाख रुपयाचा विमा काढण्यात आला असल्याचे बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या