सैनिकांसाठी पाठविण्यात येणाऱ्या तिळगुळाचे पूजन

पुणे :



शनिवार पेठ मेहूणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांच्यावतीने देशाच्या सीमेवरील सैनिकांना मकरसंक्रांतीनिमित्त देण्यात येणाऱ्या तिळगूळाचे पूजन अप्पा बळवंत चौकातील नूमवि प्राथमिक शाळेच्या सभागृहात झाले. यावेळी शि.प्र.मंडळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, पराग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, अनिल पानसे, सचिन शिंदे, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या सोनावणे व सहयोगी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
राहुल सोलापूरकर म्हणाले, सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून मकरसंक्रांतीचे वेगळे असे महत्व आहे. रामायण- महाराभारतापासून ते आजच्या काळापर्यंत सूर्य पूजनाचे महत्व लक्षात येते. आज  कोरोनाकाळात सर्वात जास्त मृत्यू  ज्या देशांत झाले, त्या देशातील लोकांमध्ये ड जीवनसत्वाचे प्रमाण कमी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले.
 
ते पुढे म्हणाले, सूर्याचे जे आठ महत्वाचे किरण मानले जातात, त्यातील सातवा किरण हा यमुना आणि गंगेत सर्वात जास्त काळ राहतो. म्हणून हिंदू धर्मात मकरसंक्रांतीच्या काळात गंगा नदीच्या जवळ विविध प्रकारचे विधी केले जातात. म्हणून गंगा नदी दोष विरहीत मानली जाते. परंतु दुर्देवाने या संशोधनाला पौराणिक संदर्भ दिले की लोक त्याला धर्माचे नाव जोडतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या