सामाजिक जबाबदारीचे जाण ठेऊन भरीव सहकार्य करने गरजेचे : चाकणकर


 दौंड  :

उद्योग सांभाळताना  सामाजिक जाण ठेऊन समाज कार्यास उपयोगी पडेल अशी मदत करणे, आज काळाची गरज ठरत आहे, असे मत महिला हक्क आयोगाच्या प्रदेश अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नायगाव येथील कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे.

ताम्हणवाडी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब एकनाथ ताम्हाणे यांनी नायगाव कार्यक्रमासाठी एक मोठे शेड आणि स्टेज बांधून दिले,याबद्दल त्यांचा सत्कार वाई खंडाळा आमदार मकरंद पाटील यांचे हस्ते सावित्रीबाई फुले जयंती दिनी आयोजित करण्यात आला होता.  भाऊसाहेब एकनाथ ताम्हाणे यांचा नायगाव ग्रामस्थ यांचे वतीने स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार मकरंद पाटील यांनी सत्कार केला.
या प्रसंगी दौंड राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, ताम्हनवाडी सरपंच अभि ताम्हाणे, मनोहर नारायण ताम्हाणे, जयसिंग लक्षीमन ताम्हाणे, गोरख सदाशिव  ताम्हाणे, गणेश टिळेकर, कालिदास झगडे ,त्या परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, प.स. सदस्य, नायगावचे सरपंच कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना भाऊसाहेब ताम्हाणे म्हणाले, नायगाव येथे सावित्री बाई फुले यांचे जयंतीदिनी राज्यासह देशातून महिला येतात. यांना येथे सोई सुविधेसाठी यापुढेही सहकार्य करीन. यावेळी तात्यासाहेब यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या