Breaking News

कांदा पिकांवर ‘संक्रांत’; शेतकरी हवालदिल
टाकळी हाजी
: गेल्या काही दिवसांपासून टाकळी हाजी बेट भाग परीसरात ढगाळी वातावरण , धुके तसेच दव पडत असल्याने कांदा पिकांसह सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. सतत ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे बहरात आलेल्या पिकांवर चिकटा, मावा आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.


शिरुर तालुक्यातील बेट भागात कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असुन कांदा पिकांवर मावा, तुडतुडे, चिकटा या किडींचा प्रादुर्भाव तर डाऊनी, करपा, मुळकुज (सड) या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. महागडया  औषधांच्या फवारण्या करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसत आहे. कांद्याबरोबर इतर पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसुन येत आहे. परिणामी पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.त्यातच महावितरण कंपनीकडून रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावल्याने शेतकऱ्यांचा समोर अडचणीत भरच पडत आहे.

*चौकट*

" कांदा पिकावर ढगाळ वातावरण, धुक्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.महागडी औषधांची फवारणी करून देखील रोग नियंत्रणात येत नाही. खतांच्या वाढत्या किमती तसेच औषधे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. वेळोवेळी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे कांद्याचे उत्पादन हाती येण्याची शक्यता कमी आहे. उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असून झालेला खर्च देखील वसूल होणे अवघड आहे. "

No comments