दुनिया हिला देंगें... आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सचा २५ जणांचा संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी


यंदाच्या लिलावात मुंबई इंडियन्सने बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. इशान किशनला या लिलावात सर्वाधिक किंमत मोजत मुंबई इंडियन्सने आपल्या संघात दाखल केले. आता मुंबईचा २५ खेळाडूंचासंघ समोर आला आहे. जाणून घ्या संपूर्ण यादी....

 , बंगळुरु : यंदाच्या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने आपले २५ शिलेदार निवडलेले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदाच्या आयपीएलमध्ये कोणते खेळाडू उतरणार आहेत, जाणून घ्या...

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी), मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख).

मुंबई इंडियन्सने यंदाच्या लिलावात इशान किशनवर सर्धाधिक १५.२५ कोटी रुपयांची बोली लावली होती, ही या आयपीएलमधील सर्वाधिक बोली ठरली आहे. त्याचबरोबर मुंबईच्या संघाने यावेळी टीम डेव्हिडला ८.२५ कोटी रुपये मोजत आपल्या संघात दाखल केले आहे. जोफ्रा आर्चर या आयपीएलमध्ये खेळणार नसला तरी त्याच्यासाठी तब्बल ८ कोटी रुपये मोजत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात दाखल केले आहे. आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवसासाठी मुंबई इंडियन्सकडे २७.८५ कोटी रुपये एवढी रक्कम होती. पण मुंबईच्या खात्यात आता फक्त १० लाख रुपये शिल्लक आहेत आणि त्यांनी तब्बल २५ खेळाडू आपल्या संघात दाखल केले आहेत. मुंबईचा संघ यावेळी चांगलाचच समतोल दिसत आहे. कारण या संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंचा चांगला भरणा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये ज्या खेळाडूंना कोणी पाहिले नाही, असे युवा खेळाडूही मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या