अंगणवाडी इमारत कोसळली, दुदैवाने चिमुकले बचावले
चांगदेवनगर परिसरातील अंगणवाडीची इमारत कोसळली
पुणतांबा :
परिसरातील चांगदेवनगर जवळच असलेल्या आठरावाडी येथे बांधलेली अंगणवाडीची इमारत कोसळल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. इमारत रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे कोणाताही अनर्थ घडलेला नाही. पुणतांबा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बलराज धनवटे यांच्या आठरावाडी येथे चारी लगतच असलेल्या वस्ती जवळ ही इमारत राष्ट्रीय समविकास योजने अंतर्गत २०११ १२ च्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या निधीतून बांधण्यात आलेली होती. ह्या कालावधीत जिल्ह्यात 300 अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेमार्फत निविदा मागवून इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. अंगणवाडी च्या इमारती अलिकडच्या काळा त सिमेंट क्राँक्रीटीकरण करून बांधल्या जातात.
मात्र २०११ - १२ च्या दरम्यान बांधलेल्या ह्या इमारती प्री फेब्रीकेटेड पॅटर्न नुसार बांधण्यात आल्या होत्या. यामध्ये फायबर शीट चा ही वापर केला जातो. तसेच रंगीत पत्रयांचाही वापर लाजतो. त्यामुळे ह्या इमारती दिसायलाही आकर्षक असतात आठरावाडी येथील इमारतही याच धर्तीवर बांधण्यात आली होती.
मात्र ज्या जागेवर इमारत उभी केली तेथे आगोवर खताचा खड्डा होता. पाया घेऊन च इमारत उभी करावी अशी सूचना त्यावेळी आपण संबंधितां ना केली होती तसेच इमारत उभी झाल्या नंतर काही महिन्यांनी फरशी फुटण्यास सुरुवात झाली होती तसेच काही ठिकाणी फटी दिसू लागल्यामुळे ह्या इमारतीचे काम योग्य पद्धतीने न झाल्याचे ठेकेदार तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिल्याचे बलराज धनवटे यांनी स्पष्ट केले .
अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांनी सुद्धा इमारती बाबद तक्रार केलेली होती मात्र त्यावर वेळेत कार्यवाही झाली नाही दुर्लक्ष करण्यात आले अखेर पत्त्यातील बंगल्या प्रमाणे ही इमारत कोसळली सुदैवाने इमारत कोसळली तेव्हा इमारतीत कोणीही नव्हते ह्या इमारतीच्या कामाची संपूर्ण चौकशी व्हावी तसेच दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
अंगणवाडी इमारत कोसळली, दुदैवाने चिमुकले बचावले
Reviewed by Rashtra Sahyadri
on
February 18, 2022
Rating: 5
No comments