तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम ग्रामपंचायत करणार : शिवाजी शिंदे

 


 टाकळीभान: 


गावातील तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध ठिकाणी निवड झाल्याबद्दल सत्कार करून कौतुकाची थाप टाकण्यात येईल असे लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले ते पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील तरुण हे अतिशय खडतर परिस्थितीतून कष्टाने मेहनतीने यश मिळवत असतात.

 आज स्पर्धेच्या युगामध्ये टाकळीभान येथील युवक आपली चमकदार कामगिरी दाखवत गावाची मान अभिमानाने उंचावत आहेत. हे तरुण भविष्यात गावातील सक्षम नागरिक होणार असून गावच्या प्रगतीत व विकासात यांचा निश्चित वाटा असणार आहे. या विविध निवडीबद्दल त्यांनी युवकांचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी अशोकच्या नूतन संचालक पदी यशवंत आप्पा रणनवरे, नूतन संचालिका सौ हिराबाई साळुंके, औरंगाबाद जिल्हा पोलीस मध्ये नितीन पटारे, एस आर पी एफ पुणे येथे राहुल जाधव, उस्मानाबाद पोलीस मध्ये गणेश पटारे, प्रमोद रणनवरे, रेल्वे पोलीस मध्ये महेश बडाख, तसेच खासदार गोविंदराव आदिक कर्मचारी सेवक पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झालेले श्री सुभाष  पटारे, श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीवर श्री अर्जुन राऊत, दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राच्या श्रीरामपूर व्यवस्थापक पदी तुषार दाभाडे, श्रीरामपूर दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त यशस्वी पथसंचलन केलेले टाकळीभान येथील जवान मेजर विजय शेंडे, एसटी डेपो चे निवृत्त कर्मचारी भाऊसाहेब बनकर आदींचा सन्मान ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच व उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप जावळे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी अशोक चे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, अशोक चे माजी संचालक भाऊ थोरात ,सरपंच अर्चनाताई रणनवरे, अशोक चे माजी संचालक दत्तात्रय नाईक, रयतचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे,ग्राम. सदस्या अर्चना पवार, ग्राम. सदस्य सुनील बोडखे, ग्राम सदस्य गणेश पवार, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष आबासाहेब रणनवरे, एकनाथ लेलकर, दत्तात्रय मगर, भाऊसाहेब कोकणे, संदीप कापसे, गोपीनाथ काठेड ,शिवाजी पवार, बाळासाहेब आहेर, संदिप कोकणे, बद्रीनाथ पटारे, सचिन माने, देवा पाबळे, अनिल दाभाडे , शिवाजी पटारे, सतीश रणनवरे,विजय लाड, सागर सोनवणे आदींसह मोठ्या प्रमाणावर तरुण युवक ,ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रामस्थ सदस्य मयूर पटारे यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या