दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र १८ फेब्रुवारीपासून


शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारायचे नसल्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारपासून (१८ फेब्रुवारी) उपलब्ध होणार आहे. प्रवेशपत्र लॉग इनमध्ये उपलब्ध झाल्यावर त्याची मुद्रित प्रत शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत.

दहावीची परीक्षा येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील शाळा लॉग-इनमध्ये दुपारी एक वाजल्यानंतर उपलब्ध होतील. त्यानंतर शाळांनी प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. त्यासाठी शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारायचे नसल्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

मोठी बातमी! अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; कारसहीत बंगल्यात शिरताना पकडल्यावर म्हटला, “माझ्या शरीरात चीप…”

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र पुन्हा मुद्रित करून त्यावर लाल शाईने ‘डुप्लिकेट’ असा शेरा लिहून ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांचे छायाचित्र सदोष असल्यास त्यावर नवे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का देऊन स्वाक्षरी करायची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या