औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ आजपासून उघडणार; पण नियम वाचलेत का?


औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभला आहे. बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेण्या, देवगिरी किल्यासह अनेक महत्वाचे पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे या भागातील स्थानीकांना यातून मोठा रोजगार मिळतो. यामुळे पर्यटन पुन्हा सुरू होणं ही औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट पाहता, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आजपासून उघडणार आहेत. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच पर्यटनस्थळांमध्ये प्रवेश दिला जाईल, असा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलतांना दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ८ जानेवारीला राज्यातील पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जानेवारी महिन्याचा शेवटला रुग्ण संख्या घटताना पाहायला मिळाली. त्यामुळे शासनाने १ फेब्रुवारीपासून पर्यटनस्थळ, नॅशनल पार्क, सफारी पार्क, स्पा, सलूनबाबत ५० टक्के उपस्थितीचे आदेश जारी केले आहेत. सोबतच स्थानिक प्राधिकरण यांनी पर्यटन स्थळात किती लोकांना प्रवेश द्यायचा याचा निर्णय घ्यावा असेही आदेशात म्हटलं होतं. त्यानुसार आजपासून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

धक्कादायक! करोनाची लस घेतल्यानेच मुलीचा मृत्यू; पित्याने न्यायालयात भरपाई म्हणून मागितले तब्बल...

हे असतील नियम....

● जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे नियमित वेळेनुसार खुली राहतील.

● ऑनलाइन तिकीटद्वारे सर्व अभ्यागतांना पर्यटनास मुभा राहील.

● सदर स्थळी पर्यटकांच्या संख्येबाबत संबंधित विभागाचे नियंत्रक प्राधिकारी निर्णय घेतील.

● पूर्णपणे लसीकरण झालेल्या पर्यटकांसाठीच केवळ पर्यटनास मुभा राहील

स्थानिकांना दिलासा....

औरंगाबाद जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभला आहे. बीबी का मकबरा, अजिंठा-वेरूळ लेण्या, देवगिरी किल्यासह अनेक महत्वाचे पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे या भागातील स्थानीकांना यातून मोठा रोजगार मिळतो. पण गेल्या दोन वर्षांपासून अधिकाधिक काळ पर्यटन स्थळ बंद करण्यात आले, त्यामुळे या लोकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांना इतर भागात जाऊन मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. अशातच आता सरकराने पुन्हा पर्यटनस्थळे सुरू केल्याने स्थानिकांनाही दिलासा मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या