लोणीत भीषण आगीत सात दुकाने जळून खाक.

 



लोणी हसनापूर रोडवरील होटेल श्री साई छत्रपती जवळ असलेल्या सात दुकानांना आग लागल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही,  या लागलेल्या आगीमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

  राहाता तालुक्यातील लोणी हसनापूर रोड वरील होटेल श्री साई छत्रपती जवळ असलेल्या सात दुकानांना रात्री दोन ते अडीच च्या सुमारास आग लागल्याने स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली या आगीमध्ये रेशीम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या सर्व साहित्याचे गोडाऊन इलेक्ट्रॉनिक्स चे दुकान फर्निचरचे दुकान तसेच चहाचे हॉटेल यातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही मात्र आग लागली त्या वेळेस चहाच्या हॉटेलमधील गॅस टाकीचा स्पोर्ट झाला व आगीने रौद्ररूप धारण केले, यामुळे सात ही दुकानांमधील कोट्यावधी रुपयांचे सर्व साहित्य जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल तसेच, पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली अनेक अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील तसेच लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.

कोरोना काळात अनेक छोटे-मोठे व्यापाऱ्यांना उपासमारीची वेळ आली होती. त्यातूनही व्यापारीवर्ग कुठेतरी सावरत असताना या अशा घटनांमुळे व्यापारीवर्ग हवादिल होत आहे. या अग्नी कांडाच्या घटनेची तात्काळ दखल घेऊन व्यापाऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी संतप्त व्यापारी वर्गातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या