महालिलावाचा आज दुसरा दिवस; ऑक्शनला सुरुवात !


मुंबई :
आयपीएल मेगा लिलाव २०२२ बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी ७४ खेळाडूंना यशस्वी बोली लागली. आयपीएल लिलावाच्या आज दुसऱ्या दिवशीही अनेक खेळाडूंना खरेदीदार मिळणार आहेत. पहिल्या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी प्रत्येकी १३ खेळाडू जोडले आहेत. दोन्ही संघ अजूनही १२ खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट करू शकतात. कोणताही संघ जास्तीत जास्त २५ खेळाडू सोबत ठेवू शकतो. डेव्हिड मलानसाठी बोली इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानसाठी कोणीही बोली लावली नाही. अजिंक्य रहाणेसाठी बोली मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेसाठी केकेआरने पहिली बोली लावली. केकेआरने त्याच्यासाठी १ कोटी मोजत संघात घेतले. एडन मार्करामसाठी बोली दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामसाठी बोली लावण्यात आली. हैदराबादने त्याला २.६० कोटीला संघात घेतले. ऑक्शनला सुरुवात चारु शर्मा आजही ऑक्शनरची भूमिका बजावत आहेत.

कोणाकडे किती रक्कम शिल्लक?

चेन्नई सुपर किंग्ज – २०.४५ कोटी.

दिल्ली कॅपिटल्स – १६.५० कोटी.

गुजरात टायटन्स – १८.८५ कोटी.

कोलकाता नाइट रायडर्स – १२.६५ कोटी.

लखनऊ सुपर जायंट्स – ६.९० कोटी.

मुंबई इंडियन्स – २७.८५ कोटी.

पंजाब किंग्ज – २८.६५ कोटी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ९.२५ कोटी.

सनरायझर्स हैदराबाद – २०.१५ कोटी.

लिलावाच्या पहिल्या दिवशी महागडे ठरलेले खेळाडू

ईशान किशन – १५.२५ कोटी (मुंबई इंडियन्स)

दीपक चहर – १४ कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)

श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)

शार्दुल ठाकूर – १०.७५ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)

वनिंदू हसरंगा – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

निकोलस पूरन – १०.७५ कोटी (सनरायझर्स हैदराबाद

हर्षल पटेल – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)

पहिल्या दिवशी इशान किशनची बाजी

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महालिलावात शनिवारी २० कोटी रुपयांच्या महाबोलीची अपेक्षा फोल ठरली. परंतु झारखंडचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन हा लिलावातील सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला. १५ कोटी, २५ लाख रुपये रकमेला मुंबई इंडियन्स संघात त्याला स्थान दिले.

पुजारा, साहा, रहाणे, इशांतचे भवितव्य आज

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, उमेश यादव आणि इशांत शर्मा या अनुभवी कसोटी क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशी लिलावात स्थान मिळाले नाही. परंतु रविवारी संघांनी उत्सुकता दर्शवली तरच या खेळाडूंचे भवितव्य ठरू शकेल. याशिवाय सुरेश रैना, डेव्हिड मिलर, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मॅथ्यू वेड, सॅम बिलिंग्स यांच्यावरही शनिवारी बोली लागली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या