Breaking News

हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; मलालानंतर, फुटबॉलपटू पॉल पोग्बाने दिली प्रतिक्रिया


मँचेस्टर युनायटेडचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बाने या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे.  कर्नाटकातील उडुपी येथील महाविद्यालयातून सुरू झालेला हिजाबचा वाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. याआधी नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्यी मलाला युसूफझाई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली होती. मलालाने ट्विटरवरुन या सर्व प्रकरणावर भाष्य केले होते. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बा याने या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे. पॉलने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ पोस्ट केला. हिंदुत्व जमाव कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम मुलीला लक्ष्य करत आहे, असे पॉलने म्हटले आहे. पुढील व्हिडिओमध्ये पॉलने वर्णद्वेषावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉलच्या या व्हिडिओमध्ये एका बाजूला हिजाब घातलेल्या मुली आहेत तर दुसऱ्या बाजूला भगवा परिधान केलेल्या मुलांचा जमाव घोषणाबाजी करताना दिसत आहे. कर्नाटकात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बाजूने आणि विरोधात निदर्शने तीव्र झाली आहेत आणि काही ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळणही लागले आहे. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

No comments