‘द काश्मीर फाइल्स’ पाहिल्यानंतरची दुर्दैवी घटना


 मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा फुटून तरुणाचा मृत्यू

‘द काश्मीर फाइल्स‘ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. काश्मिरी पंडितांच्या विषयावरील कथेने काही गटांकडून याला प्रशंसा मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी रन केल्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर म्हणून घोषित करण्यात आला आहे. काश्मीर हिंदूंच्या नरसंहार आणि निर्गमन यावर आधारित, विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ने भारतात आणि आजूबाजूला प्रचंड वादाला तोंड फोडले आहे. अनेक ठिकाणी हा सिनेमा आवडीने पाहिला जात आहे, तर चुकीच्या कथानकाचा आरोप करून या सिनेमाला प्रचंड विरोधही होत आहे. आता ‘द काश्मीर फाइल्स’च्या हृदयद्रावक कथेचा पुण्यातील एका युवकावर झाला आहे. हा परिणाम इतका धक्कादायक होता, की त्याला ब्रेन स्ट्रोक आला आणि नंतर मृत घोषित करण्यात आले.


हिंदुत्ववादी संघटनेचा प्रभाव

वृत्तानुसार, पुण्यातील 38 वर्षीय अभिजित शशिकांत शिंदे 21 मार्च रोजी काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत गेला होता. हिंदुत्ववादी संघटनेचा प्रभाव असलेल्या अभिजितने द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर आपल्या मित्रांसोबत तासभर चर्चा केली. त्यानंतर तो घरच्यांशी न बोलता झोपला. त्यानंतर सकाळी अभिजितला ब्रेन स्ट्रोक आला. त्याचे वडील त्यांच्या खोलीत गेले असता त्यांनी अभिजितला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला आयसीयूमध्येही दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी अभिजितला चिंचवडमध्ये मृत घोषित करण्यात आले.



खूप संवेदनशील होता अभिजित

रिपोर्ट्सनुसार, मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने अभिजित बेशुद्ध झाला. अभिजित खूप संवेदनशील होता, परिणामी त्याला उच्च रक्तदाब होता. दुर्दैवाने याचा परिणाम त्याच्या मृत्यूमध्ये झाला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘शरीरात रक्तदाब वाढल्यामुळे ब्रेक स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. झोपेतही रक्तदाब कमी-अधिक होत असतो. दरम्यान, आदल्या रात्री हा सिनेमा पाहिल्याने त्याच्या रक्तदाबावर परिणाम झाला का, हे अद्याप स्पष्ट नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या