पुणे शहराच्या पाणी वितरणात ३५ टक्के गळती


 पुणे :
शहराला पाणीपुरवठा करताना विविध कारणांनी ३५ टक्के गळती आहे. ही गळती रोखण्यासाठी जलमापके बसविणे, जुन्या जलवाहिन्या बदलणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार पाणी वितरणातील गळती १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी कबुली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (महाराष्ट्र वॉटर र्सिोसेस रेग्लुलेटरी अॅलथॉरिटी – एमडब्ल्यूआरआरए) दिली.

शहराच्या पाणी वापराबाबत जलसंपत्ती प्राधिकरणाकडे झालेल्या सुनावणीत महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. महापालिकेकडून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून कमी पाणी उचलण्यात येत आहे. गेल्या तिमाहीत दररोज घेण्यात येणाऱ्या पाण्यात ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) एवढे पाणी कमी घेण्यात येत आहे. तसेच बांधकामासाठी आतापर्यंत प्रक्रिया केलेले पाच लाख लिटर पाणी वापरण्यात आले आहे. महापालिकेच्या पाणीवितरणात ३५ टक्के गळती (नॉन-रेव्हेन्यू वॉटर – एनआरडब्ल्यू) आहे. मात्र, ही गळती रोखण्यासाठी जलमापके बसविणे, जुन्या जलवाहिन्या बदलणे ही कार्यवाही करण्यात येत आहे. त्याद्वारे पाणी वितरणातील गळती १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापालिकेने सुनावणीदरम्यान ही सर्व माहिती तोंडी दिली असून शपथपत्राद्वारे विस्ताराने ही माहिती देण्याचे आदेश प्राधिकरणाने महापालिकेला दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या