मैदानात डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात ठसन! पण…


पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये तिसरी कसोटी सुरू आहे. या आधीच्या दोन कसोटी सामने अनिर्णित ठरले. त्यामुळे विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे.

तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला असून कसोटी मालिका सुरू आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये तिसरी कसोटी सुरू आहे. या आधीच्या दोन कसोटी सामने अनिर्णित ठरले. त्यामुळे विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. पण तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर असे काही घडले की, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांचा मैदानात वेगळाच अंदाज पाहायला मिळाला आणि एवढेच नाही तर हे दोघेही क्रिकेटपटू यावेळी एकमेकांना ठसन देताना दिसले. असा काही प्रकार मैदानात घडला की क्रीडाप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरतो.


ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात चुरशीची स्पर्धा झाली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीनआफ्रिदी गोलंदाजी करत असताना डेव्हिड वॉर्नरने त्याच्या चेंडूचा बचाव केला. फॉलो-थ्रू पूर्ण केल्यानंतर शाहीन आफ्रिदी थेट डेव्हिड वॉर्नरपर्यंत पोहोचला आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. दोघेही एकमेकांकडे बघू लागले आणि नंतर हसत-मस्करी करत निघून गेले. मात्र यादरम्यान दोघांचा क्लिक झालेला फोटो व्हायरल होत आहे. डेव्हिड वॉर्नर कमी उंचीचा आणि शाहीन आफ्रिदी उंच असल्याने हा फोटो वेगळच काहीतरी सांगून जातो.

२४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १९९८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. आता ऑस्ट्रेलियन संघ २०२२ मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचे दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. आता हा तिसरा कसोटी सामना अनिर्णीत संपणार की या कसोटी सामन्याचा निकाल लागणार हे पाहावे लागेल. कसोटी सामन्याचे अजून २ दिवस बाकी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या