“आम्ही काही साधेभोळे नाही”; रशियाच्या आश्वासनानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची संशयी भूमिका


आमच्या विनाशासाठी लढा देत असलेल्या देशाच्या काही प्रतिनिधींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही, असंही झेलेन्स्की म्हणाले आहेत.

युक्रेनने किव्ह आणि दुसर्‍या शहराभोवती लष्करी कारवाया कमी करण्याच्या वाटाघाटीतील रशियाच्या आश्वासनावर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, “युक्रेनियन लोक भोळे लोक नाहीत. युक्रेनियन लोकांनी त्या ३४ दिवसांच्या आक्रमणादरम्यान आणि गेल्या आठ वर्षांच्या डॉनबासमधील युद्धात आधीच शिकले आहे की केवळ ठोस निकालावर विश्वास ठेवता येईल.”

मात्र, वाटाघाटीतून सकारात्मक संकेत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्हाला चर्चेतून जे संकेत मिळाले ते सकारात्मक आहे. पण अर्थात आम्ही सर्व धोके तपासून पाहत आहोत. आमच्या विनाशासाठी लढा देत असलेल्या देशाच्या काही प्रतिनिधींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही.”

रशियाने मंगळवारी किव्ह आणि परिसरात लष्करी कारवाया कमी करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी धोका अजून संपलेला नाही, असं सांगत अमेरिकेने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

समोरासमोर झालेल्या वाटाघाटीमध्ये युक्रेनने तटस्थ स्थिती अवलंबण्याचा पर्याय सुचवल्याने धोका कायम असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. रशियाने किव्हच्या सभोवतालच्या स्थानांवरून फारच कमी सैन्याला हलवण्यास सुरुवात केली आहे असं पेंटागॉनने मंगळवारी सांगितले. प्रवक्ते जॉन किर्बी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “आपण सर्वांनी युक्रेनच्या इतर भागांवर मोठ्या हल्ल्यासाठी तयार असले पाहिजे. सैन्य कमी केलं याचा अर्थ असा नाही की किव्हचा धोका संपला आहे.”

ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने इंटेलिजन्स अपडेटमध्ये म्हटले आहे: “रशिया पूर्वेकडील डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशात त्यांच्या आक्रमणासाठी उत्तरेकडील लढाऊ शक्ती वळवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या