हर्षा भोगलेंवर लाईव्ह चर्चेदरम्यान हल्ला?


अचानक फोन खाली पडून गायब झाल्याने चाहते चिंताग्रस्त; अखेर पत्नीने केला खुलासा

हर्षा भोगलेंसोबत नेमकं काय झालं? लाईव्ह चर्चेदरम्यान अचानक गायब का झाले?; समोर आलं कारण

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांचा एक व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हर्षा भोगले इन्स्टाग्रामवर एका लाईव्ह चर्चेत सहभागी झाले असतानाच अचानक त्यांचा मोबाइल खाली पडला. यावेळी हर्षा भोगलेंचा आवाज ऐकून त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. दुसरीकडे मुलाखत घेणाराही वारंवार हर्षा भोगले यांना आवाज देत असताना समोरुन उत्तर येत नव्हतं. यानंतर हर्षा भोगले यांचे चाहते चिंता व्यक्त करु लागले होते. ट्विटरवरदेखील हर्षा भोगले ट्रेंड होत होते.


नेमकं काय झालं होतं?

६० वर्षीय हर्षा भोगले इन्टाग्रामवर आयपीएल संदर्भात एका चर्चेत सहभागी झाले होते. सूत्रसंचालकाने हर्षा भोगले यांना आयपीएलमध्ये नेमका कोणता संघ सर्वाधिक मजबूत संघ म्हणून पुढे येईल, असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर हर्षा भोगले उत्तर देत होते. मात्र अचानक मध्येच त्यांचा फोन खाली पडला आणि पुसटशी इमेज दिसू लागली.

हर्षा भोगलेंचं ट्वीट –

हर्षा भोगले यांनी व्हायरल झालेल्या या घटनेवर स्पष्टीकरण देताना आपण ठीक असून तुम्ही व्यक्त केलेलं प्रेम आणि काळजीसाठी आभार असल्याचं म्हटलं आहे. “मी ठीक आहे. तुम्हाला मी खूप चिंतेत टाकलं याबद्दल क्षमस्व. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजी आणि प्रेमासाठी आभार. मला वाटलं होतं त्यापेक्षाही हे जास्त व्हायरल झालं. हीदेखील माझ्यासाठी शिकवण आहे. यामधून वेगळा अर्थ निघणं अपेक्षित होतं, पण माफी असावी,” असं हर्षा भोगले यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

हर्षा भोगले यांनी यावेळी आपण अचानक गायब होणं पूर्वनियोजित होतं सांगताना आपल्याला लाजिरवाणं वाटत असल्याचं म्हटलं आहे. “तुम्ही रोज काहीतरी नवं शिकता. हे करणं हलकेफुलकं वाटलं होतं, पण ते प्रत्यक्ष करताना असं काहीतरी होईल याची कल्पना नव्हती. खरं तर मला आता थोडी लाज वाटतीये,” असंही हर्षा भोगले म्हणाले आहेत.

दरम्यान Sportwalk सोबत हर्षा भोगले चर्चा करत होते त्यांनीदेखील ते ठीक असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हर्षा भोगले यांच्या पत्नीनेही या घटनेवर स्पष्टीकरण दिलं असून ते ठीक असून, व्हायरल झाला तो एक प्रोमो होता अशी माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या