पुणे महापालिकेत मिळकत कराचे विक्रमी उत्पन्न ; नागरिकांनी भरला 1846 कोटींचा कर

 


ऑनलाईन कर भरण्याला प्राधान्य

पुणे – कोरोनाच्या काळातही पुणे महापालिकेने उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. महापालिकेच्या 2021-22 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेर मिळकतकर विभागानेही 1846 कोटींचा महसूल वसूल मिळवला आहे.   या वर्षभराच्या कालावधीत 8 लाख 68 हजार 671 मिळकत धारकांनी हा कर जमा केला असून त्यात सर्वाधिक 70 टक्के कर ऑनलाइन जमा झाला आहे तर रोख रकमेच्या स्वरूपात 17 टक्के आणि धनादेशाच्या स्वरूपात 13 टक्के कर जमा झाला आहे. तर या वर्षी सुमारे 71 हजार नवीन मिळकती कर आकारणीत आलेल्या आहेत . तर थकबाकी असलेल्या 7 हजार 300 मिळकती सील करण्यात आलेल्या आहे.  बांधकाम विभागाकडून गेल्या वर्षभरात उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या.   बांधकामांना तातडीने परवानगी देण्यासाठी ऑटो डीसीआर प्रणाली राबविण्यात आली आहे.


विभागाकडून विशेष प्रयत्न

कोरोना काळात महानगरपालिकेच्या विभागाकडून मिळकत कराच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरु होते. थकबाकी वसुलीसह नवीन कर आकारणी, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोपी यंत्रणा, वसुलीसाठी विशेष नियोजन केले असल्याने विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या विलास कानडे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या