पंजाब मध्ये 300 युनिटपर्यंत वीज मोफत,


महाराष्ट्रात पैसे मोजूनही वीज नाही- डुंगरवाल

श्रीरामपूर : पंजाब मध्ये अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आप चे सरकार सत्तेत आले आहे आम आदमी पार्टी सत्तेत येताच निवडणुकी काळात करण्यात आलेल्या घोषणांचा धडाकाच लावला मुख्यमंत्री यांनी सत्तेत येऊन एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाला आहे या निमित्त आता पंजाब  सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील प्रत्येक घरात ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे एक जुलैपासून पंजाब मध्ये प्रत्येक घरात ३०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य मोठा दिलासा मिळालेला आहे या घोषणेचा सर्वत्र आनंद साजरा करण्यात येत आहे आम आदमी पार्टी जनतेला केलेले वायदे हे पूर्ण करते हे दिल्लीनंतर पंजाबमध्येही सिद्ध करून दाखवले एकीकडे अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सरकारने  येथील जनतेला मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे, दुसरीकडे महाराष्ट्रात पैसे मोजूनही वीज नाही असा आरोप यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केला कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने पैसे देऊन देखील वीज मिळत नसल्याचे चित्र आहे महाराष्ट्रात विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढण्यात आले आहे, कोळसा नसल्याने राज्यावर वीज संकट गडद झाले असून,  महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये भारनियमनाला ही सुरुवात झाली आहे महाराष्ट्र सरकार जनतेकडून पैसे घेऊनही जनतेचे हाल करत असल्याचा आरोपही जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या