‘परीक्षा की बात, पीएम के साथ’


 आज 11 वाजता पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

 नवी दिल्ली : सध्या सगळीकडे परीक्षेचं  वातावरण आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी मेहनत देखील घेतायेत. अशातच विद्यार्थ्यांना परीक्षेचा कोणताही ताण येऊ नये, विद्यार्थ्यांनी तणावरहीत परीक्षेला सामोरं जावं, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा 2022 हा कार्यक्रम आज सकाळी अकरा वाजता नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेच्या तयारीच्या पद्धती, तणावमुक्ती यासह विविध विषयांवर देसभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा की बात, पीएम के साथ’या मोठ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाचा उद्देश मुलांसाठी परीक्षेच्या वेळी तणामुक्त वातावरण निर्माण करणे आणि प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एकत्र आणणे, हा आहे.


तणावमुक्तीसाठी एक पाऊल

2022 मध्ये पीपीसीच्या चौथ्या भागात पंतप्रधानांनी तणाव कमी करण्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित, मुक्त आणि निरोगी वातावरण निर्माण व्हावं, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते. बोर्डाच्या परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांवरील पालक आणि शिक्षकांचा दबाव कमी करण्याच्या गरजेवरही पंतप्रधान मोदी यांनी भर दिला आहे. पीपीसी 2022 हा कार्यक्रम ऑफलाईन असणार आहे. प्रोटोकॉलनुसार, तो थेट प्रक्षेपीत केला जाईल. पीपीसी 2022चं थेट प्रक्षेपण शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध असणार आहे.

इथे पाहा ऑनलाईन कार्यक्रम

पीपीसी 2022 यूट्यूबवर थेट पाहण्यासाठी देखील उपलब्ध असणार आहे. परीक्षेवरील चर्चेचा कार्यक्रम तुम्ही घरी बसूनही पाहू शकता, शिक्षण मंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. परीक्षा पे चर्चा 2022 चा पाचवा भाग आज सकाळी अकरा वाजता सुरू होईल. या वर्षी परीक्षा पे चर्चा याला टॅगलाईन परीक्षा की बात, पीएम के साथ यासोबत जोडलं आहे. प्रत्येक दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा आली की विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यांचा तणाव कसा कमी होईल, विद्यार्थ्यांवर पालकांचा दबाव कसा येऊ नये, याकडे देखील पंतप्रधानांचे लक्ष असते. आता आज होणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी, पालक आणि शिक्षकांशी देखील पंतप्रधान मोदी सांवाध साधतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या