भारत-अमेरिका शैक्षणिक संबंध विस्तारणार

 



वॉशिंग्टन :
भारत व अमेरिका यांच्यातील वाढते द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करण्यासाठी, या दोन देशांतील शैक्षणिक संबंध आणखी सखोल करण्याचे महत्त्व दोन्ही देशांच्या दोन उच्चपदस्थ राजनैतिक अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले आहे.


अमेरिका-भारत उच्च शिक्षण चर्चेचा भाग म्हणून परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी येथील हॉवर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

जगातील सर्वात जुन्या व सर्वात मोठय़ा लोकशाही म्हणून अमेरिका व भारत यांना ‘एकमेकांपासून शिकण्यासारखे नेहमीच काही तरी आहे,’ असे ब्लिंकन यांनी या वेळी केलेल्या भाषणात सांगितले. या दोन देशांच्या सोमवारी झालेल्या २ अधिक २ मंत्रिस्तरीय संवादात विशेषत: शिक्षण क्षेत्रासह द्विपक्षीय संबंध वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.


या दोन्ही देशांनी नवा भारत-अमेरिका शिक्षण व कौशल्य विकास कार्यगट स्थापन करण्याची आपली इच्छा जाहीर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या