Breaking News

औषधं न खाताही मधुमेहावर मिळवायचे आहे नियंत्रण? ‘या’ बियांचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी
आपल्याकडे असे अनेक लोक आहेत ज्यांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. मात्र हेच लोक मेथीचे थेपले किंवा पराठे खाणे पसंत करतात. मेथी कोणत्याही स्वरूपात खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. असे मानले जाते की पोट किंवा कंबरदुखीवर एक चमचा मेथीचे दाणे पाण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की लोहयुक्त मेथी मधुमेह नियंत्रणात आणण्यातही महत्त्वाची भूमिका पार पडते.

मेथीचे अँटीडायबेटिक गुणधर्म सर्वज्ञात आहेत. गेल्या काही वर्षांत मेथीच्या बियांच्या औषधी गुणधर्मांवर अनेक संशोधने झाली आहेत. सौदी अरेबियातील सौदी विद्यापीठात केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की मेथीच्या बियांमध्ये मधुमेहरोधक, अँटीकॅन्सर, प्रतिजैविक, वंध्यत्व, अँटीपॅरासाइटिक स्तनपान उत्तेजक आणि हायपोकोलेस्टेरोलेमिक गुणधर्म आहेत.

मेथी ही प्रथिने आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहे आणि त्याच्या बायोअ‍ॅक्टिव्ह गुणधर्मांमुळे मेथी औषध म्हणून वापरली जाऊ शकते. या संशोधनात मेथीच्या अनेक आरोग्यविषयक फायद्यांविषयी सांगण्यात आले आणि असे आढळून आले की रोजच्या आहारात मेथीचा समावेश करणे चांगले आहे.

मधुमेहाविरुद्ध मेथीचे फायदे यावरही संशोधन करण्यात आले असून टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाशी संबंधित मेटाबॉलिज्म लक्षणे कमी करण्यासाठी मेथी प्रभावी असल्याचे यात आढळून आले आहे. मेथीच्या सेवनाने रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते, तर रुग्णाच्या ग्लुकोजच्या पातळीतही लक्षणीय सुधारणा होते. इन्सुलिनवर अवलंबून टाइप १ मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या रोजच्या आहारात १०० ग्रॅम मेथीच्या बियांच्या पावडरचा समावेश केल्याने एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड कमी होण्यास मदत होते.

तुम्हालाही आहे जेवल्यावर लगेचच पाणी प्यायची सवय? जाणून घ्या या सवयीचे गंभीर तोटे

मेथीचे अँटीव्हायरल गुणधर्म घशाच्या दुखण्यावर एक शक्तिशाली हर्बल उपाय आहेत. केस गळणे, बद्धकोष्ठता, आतड्यांसंबंधी त्रास, मूत्रपिंडाचे आजार, छातीत जळजळ, पुरुष वंध्यत्व आणि इतर प्रकारचे लैंगिक आजार यावर उपचार करण्यासाठी मेथी प्रभावी असल्याचे आढळले आहे.

No comments