पोलीस अधीक्षक कार्यालयात महिलेचा पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

 


अहमदनगर : आपला फोटो एक व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याची तक्रार कोणी ऐकत नसल्याच्या रागातून श्रीगोंदा येथील एका महिलेने पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक प्रकार घडला असून सुदैवाने ही महिला वाचली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील एक महिला आपला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याची तक्रार देण्यासाठी बेलवंडी पोलिस ठाण्यात गेली होती मात्र ही तक्रार सायबर क्राईम मध्ये मोडत असल्याने त्यांनी सायबर पोलिसठाण्यात जाण्यास सांगितले. सायबर पोलीस ठाण्यातही महिला महिलेची तक्रार न घेतल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले होते.

याप्रकरणी श्रीगोंदा येथील महिलेविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोफखाना पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल शफी सलीम
शेख यांनी फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या