मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार फरार आरोपी 29 वर्षानंतर अखेर जेरबंद

 मुंबई साखळी बॉम्बस्फोट : फरार चौघे २९ वर्षांनंतर जेरबंद 



 मुंबईत १९९३ मध्ये १२ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील २९ वर्षांपासून वॉन्टेड असलेले चार आरोपी  जेरबंद करण्यात आले आहे. अहमदाबादमधून अटक केलेल्या या चौघा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने या चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही सुनावणी संपल्यानंतरच हे प्रकरण सीबीआयने गुजरात एटीएसकडून ताब्यात घेतले आहे.

गेल्या २९ वर्षांपासून गुजरात एटीएस आणि सीबीआयचे पथक मुंबईतील सिरील बॉम्बस्फोटातील या चार आरोपींचा शोध घेत होते. गुजरात एटीएसने या चार आरोपींना गेल्या आठवड्यात अहमदाबादमधून पकडले.

गेली २९ वर्षे मुंबई बॉम्बस्फोटातील हे आरोपी कायद्यापासून दूर पळत होते, कदाचित आता पोलिसांनी त्यांचा शोध थांबवला असावा असे त्यांना वाटू लागले असावे. पण गेल्या आठवड्यात गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या चौघांना अटक केली. या चार आरोपींच्या शोधात केवळ मुंबई पोलीस, सीबीआय किंवा गुजरात एटीएसच नाही तर जगातील अनेक सुरक्षा यंत्रणा या आरोपींचा शोध घेत होत्या. या चारही आरोपींविरुद्ध इंटरपोल आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. या स्फोटांमध्ये ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी १८९ जणांविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. २००६ मध्ये मुंबई न्यायालयाने यातील १०० आरोपींना दोषी ठरवले होते. हे आरोपी दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या