Breaking News

यशवंत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जागविल्या जुन्या आठवणी


शाळेला ११ हजाराची देणगी ; सर्वच शिक्षकांचा केला सन्मान

पढेगाव : शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक जन कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते येथील यशवंत महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे..

सन १९९१-९२ या सालातील एस एस सी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा यशवंत विद्यालय पढेगाव येथे मोठ्या  उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक वेताळ सर हे होते.

या वेळी माजी विद्यार्थी  संतोष रोकडे ,अमीन सय्यद,प्रदीप आहेर,  डॉ. तनुजा गेटमे, विलास पगार,मनोज भारस्कर, वैशाली बनकर या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

या बॅचच्या काळातील सर्व शिक्षकांनाही या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. या   मेळाव्यास प्रा.तागडसर, प्रा.पठाण सर ,प्रा पावशे सर, प्रा.भगत सर,प्रा चांगदेव कडू सर,  प्रा.बी टी क्षिरसागर,प्रा.काकडे सर,प्रा.रामचंद्र गायधने सर,प्रा.नवगिरे सर,प्रा.आर जी काळे सर ,प्रा.जगधने सर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रमेश मकासरे.,विकास बनकर ,.अशोक खरात ,रविंद्र खरात जावेद शेख, अर्चना धनवटे, वसुंधरा गायकवाड, मनोज भारस्कर , वैशाली बनकर ,सुवर्ना कांदळकर, अल्ताफ सय्यद, अमिन सय्यद ,अविनाश पायगुडे,  बडाख अनिल, शशीकांत बनकर, प्रशांत कुलकर्णी,बबन महानोर, विठठल माने ,प्रेमा फुलपगार,राजू गायके,संतोष रोकडे, सतिष बनकर सुजित बनकर ,सुनंदा खरात ,संदिप बनकर, विलास पगार,  प्रदिप आहेर, वैशाली पायगुडे,वृषाली पाटील ,महेश देशपांडे, विजय  येसेकर,आशा शेळके,बाळासाहेब कांदळकर ,सुधीर जगताप ,भारत शिंदे, स्वाती गिरमे, सुनंदा तनपुरे  ,राजू जमदाडे   ,      शशिकांत शिंदे,लक्ष्मण  सुसरे,बेबी सुसरेडॉ०  गेटमे तनुजा,संपत चौधरी ,ज्योती धनवटे,अनिता वैद्य,समीर शेख सविता गोरे,मीरा बनकर,अलका रोकडे.विजय हौशाबापु खरात .वंदना आहेर,सविता बनकर आदि उपस्थित होते.

प्रास्ताविक रमेश मकासरे, सुत्रसंचालन विकास बनकर व सुवर्णा कांदळकर यांनी तर आभार सुजित बनकर यांनी मानले. 

यावेळी या बॅच च्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सुमारे ११ हजार रुपयांची  देणगी देण्याचे जाहीर केले.

तसेच कै. ज्ञानेश्वर देवराय यांच्या कन्येस पुढील  शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले.

No comments