उसाच्या वाहनांची मिरवणूक काढून गळीत हंगामाची सांगता

 


कर्जत प्रतिनिधी- कर्जत तालुक्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप आज झाला. याप्रसंगी शिवछत्रपती ऊस वाहतूकदार संघटनेचे प्रमुख दादासाहेब सुरवसे व शेतकऱ्यांनी  मोठ्या उत्साहाने सांगता केली. शेवटच्या उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टर यांना सजविण्यात आले होते. या सर्व वाहनांची कर्जत शहरांमधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी गुलालाची उधळण केली फटाके फोडले तसेच हलग्या लावून जल्लोषात गळीत हंगामाचा समारोप केला.

यावेळी बोलताना दादासाहेब सुरवसे यांनी सांगितले की यावर्षी कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस होता. एवढ्या मोठ्या उसाची सुयोग्य नियोजन अंबालिका कारखान्याच्या व्यवस्थापनाने केले. शिवछत्रपती ऊस वाहतूक संस्थेने तब्बल 21 हजार मेट्रिक टन ऊस वाहतूक केला. हा एक विक्रम नोंदवला गेला आहे. यावर्षी अतिरिक्त ऊस सर्वत्र झाल्यामुळे ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे ऊसतोडणी मजूर गावाकडे परत जात होते. शेतकऱ्यांच्या शेतामधील उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता अशा वेळी आम्ही स्वतः याठिकाणी पुढाकार घेऊन काही ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या तयार करून शेवटच्या दिवसांपर्यंत शेतकऱ्यांचा ऊस तोडून तो वाहनांमधून कारखान्यापर्यंत पोहोचवला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारखाना बंद होण्याच्या भीतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ऊस तोडताना जो आनंद पहावयास मिळत होता तू खूप मोठा होता आणि त्यांनी समाधान मिळाले असे देखील सुरवसे यांनी यावेळी सांगितले.

या वर्षीच्या गळीत हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे ऊस वाहतूक करणारे व शेतकरी यांनी मोठ्या जल्लोषात मध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मिरवणूक काढली, हलगी लावून आनंद साजरा केला फटाके फोडले व समारोप केला. हा चर्चेचा विषय सर्वत्र झाला आहे. अशा पद्धतीने गळीत हंगामाचा समारोप यापूर्वी कधीही झाला नव्हता अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या