रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया: “ठाकरे सरकारला…”


खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी “मी अशी काय चूक केली की त्याची शिक्षा देण्यात आली,” असा सवाल ठाकरे सरकारला केला. तसेच १४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार असल्याचं मत व्यक्त केलं. त्या लीलावती रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, “माझा ठाकरे सरकारला सवाल आहे की मी अशी काय चूक केली की त्याची मला शिक्षा देण्यात आली. जर हनुमान चालिसाचं पठण करणं आणि भगवान श्रीराम यांचं नाव घेणं गुन्हा असेल आणि त्यासाठी मला १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर मी १४ दिवस नाही, तर १४ वर्षे तुरुंगात राहण्यास तयार आहे.”

“तुरुंगात टाकून ते एका महिलेचा आवाज दाबू शकतील असं त्यांना वाटत असेल, तर १४ दिवसात ही महिला दबली जाणार नाही,” असंही नवनीत राणा यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या