अबब... तब्बल 9 फुटाचा अजगर सापडला अन....

 रस्त्यावर आला ९ फुटाचा अजगर  




 पिंपरणे -


संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटालगत सोमवारी मध्यरात्री ९ फूट लांबी व ७ किलो वजन असलेला अजस्त्र अजगर आढळला. सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने वनविभागाच्या मदतीने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहेत. तर, परिसरात अजगर आढळल्याची ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

 
 सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमाराला विशाल शिंदे हे वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटाच्या पायथ्याशी एक मोठा साप रस्ता ओरडतांना दिसला.  स्थानिकांनी याबाबत सर्पमित्र शिवाप्रसाद पवार यांच्याशी संपर्क केला. मोठ्या शिताफीने या सापाला ताब्यात घेऊन हा अजगर असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. 

दरम्यान सकाळी वनक्षेत्र अधिकारी एस.एस. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बबन मंचरे, व वनरंक्षक रामकृष्ण सांगळे यांनी या अजगराला ताब्यात घेऊन हा ३ वर्ष वय असलेला मादी अजगर असल्याची माहिती दिली. सर्पमित्र शिवाप्रसाद पवार व डॉ.अनिल क्षिरसागर यांच्या मदतीने त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संजय गायकवाड आदिसह परिसरातील नागरिक हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या