महाविकास आघाडीच्या आमदारांना शिवसैनिकांनी केले नजरकैद

  महाविकास आघाडीचे आमदार हॉटेलमध्ये शिवसैनिकांच्या नजरकैदेत!



दगाफटका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची व्यूहरचना; शिवसेनेकडून आमदारांसाठी व्हिप जारी


महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 18 वर्षानंतर राज्य सभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणारच, यावर शिक्कामोर्तब झाले. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार शिवसेना 55 आमदार, काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार (अनिल देशमुख आणि नवाब मलिक वगळता), यांच्यासह पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांची एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची ही खास व्यूहरचना आहे. शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांना हॉटेलमध्ये सुरक्षितही ठेवलं जाणार आहे. हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिकही नजर ठेवणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या सरकारने बघता बघता यशस्वी अडीच वर्ष आपण पूर्ण केली आहेत. येणारी अडीच वर्षही आपलीच आहेत. आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे. यासाठी कुणालाही घाबरायचं नाही जुमानायचं नाही, सामान्य शिवसैनिकांला न्याय द्यायचा आहे. संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे. संजय पवार हे एक शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. एका कट्टर शिवसैनिकासाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतं फुटू नयेत म्हणून शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर सर्व आमदार बैठकीनंतर सर्व आमदार रिट्रिट हॉटेलकडे रवाना झाले. आजचा दिवस हॉटेल रिट्रिट इथे आमदारांना मुक्कामी ठेवल्यानंतर सर्व आमदारांना हॉटेल ट्रायडंट इथे आणण्यात येणार आहे. उद्या शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत काही अपक्ष आमदारही उपस्थित होते. वर्षावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विजयाचा आत्मविश्वास दिला आहे. शिवसेनेकडून आपल्या आमदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे.

राज्यसभेच्या सहा जागासाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सहा जागासाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणुक मोठी रंगतदार होणार आहे. शिवसेना आमदार आणि समर्थक लहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेने बैठक बोलवली होती. 10 जून पर्यंत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी हॉटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली आहे.


_______________

काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढणार

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आणि महापौर देखील काँग्रेसचाच बनवणार असा संकल्प काँग्रेस नेत्यांनी केला आहे. पनवेल येथे काँग्रेस पक्षाच्या दोन दिवशीय कार्यकर्ता शिबिरात वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. काँग्रेस नेते भाई जगताप , बाळासाहेब थोरात यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 'एकला चलो रे'चा नारा दिला. काँग्रेस पक्ष स्वबळावर मुंबईत लढून आपलाच महापौर बनवणार असल्याचे भाई जगताप आणि बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
______________

नडायचं हाय आता भिडायचं हाय.....

कुणाला घाबरायचं नाही, कुणाला जुमानायचं नाही, आपल्याला कट्टर शिवसैनिकाला आणि संजय राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे, असं सांगत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ’तुम्हाला कोणत्याही ऑफर आल्या, प्रलोभने आली तरी बळी पडू नका. धमक्या आल्या तरी भीक घालू नका’, असा आक्रमक संदेश उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. अपक्ष आमदारांचा वधारलेला भाव पाहता आणि फडणवीसांनी प्रत्येक अपक्ष आमदाराला फोन केल्याचं लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या स्टाईलने पाठिंब्यासाठी गळ घातली.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या