टिळकनगरजवळ कॅनॉलमध्ये तरूणीचा मृहदेह आढळला.


घातपात केल्याचा नातेवाईकांचा आरोप 

श्रीरामपूर : शहरातील वाँर्ड नं. 7 येथील मोरगेवस्ती शिवारातील तरुणी वैशाली उर्फ कल्याणी धीरज पारोळकर (वय 34) हिचा मृतदेह रविवारी (दि. 26) जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला खंडाळा - रांजणखोल रोडच्या पाठीमागील अचानकनगर येथील पाटाच्या पुलाला अडकलेल्या अवस्थेतील आढळून आला.यावेळी तेथे बघ्यांनी एकच गर्दी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, मयत तरुणी कल्याणी उर्फ वैशाली हिचा पती धीरज पारोळकर यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे मयत तरुणी वैशालीचे तिच्या पतीसोबत या कारणावरून वादावादी झाली होती.या वादातूनच पती धीरज पारोळकर हा वैशाली हिला मारहाण करून तिचा राग करत होता. त्यामुळेच वैशाली हिच्यासोबत पतीकडून घातपात झाला असावा असल्याचा खळबळजनक आरोप वैशाली हिच्या माहेरच्या नातेवाइकांनी केला आहेत.

  सकाळीच खंडाळा शिवारातील पाटाच्या पुलाला हा मृतदेह आढळल्याने याबाबतची माहिती सतर्क ग्रामस्थांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील कृष्णा अभंग यांना दिली. तातडीने कोणताही विलंब न करता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कळविले असता, याबाबतीत शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या