गावठी कट्टा बाळगताना आरोपी गजाआड : या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत



      




 श्रीरामपूर - 

 गावठी कट्टा व दोन जिवंत कारतुसे घेऊन फिरताना एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक ची माहिती अशी की सोमवारी पोलीस निरीक्षक खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव येथील राहणारा प्रशांत उर्फ पांडुरंग साईनाथ लेकुरवाळे हा खैरी निमगाव - चितळी रोडवर साई समर्थ मंगल कार्यालया जवळ दुपारच्या सुमारास गावठी कट्टा जवळ बाळगून फिरत आहे. यानुसार पोलीस निरीक्षक खाडे, पो.स.ई. अतुल बोरसे, पो.ना शेंगाळे, पो.काॅ. सुनिल दिघे, पोलिस चालक यांच्या पथकाने कारवाई करत प्रशांतला ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा सुमारे 20,000 रु. किंमतीचा व 2
जिवंत काडतुसे 1000 रु. किंमतीचे असा एकूण 21 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडील गावठी कट्टा जप्त करण्यात आला. या घटनेवरून प्रशांत ऊर्फ पांडूरंग यांच्याविरुद्ध गावठी कट्टे बाळगल्याप्रकरणी श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधीक तपास पोसई अतुल बोरसे हे करीत आहेत.

आरोपी लेकुरवाळे यांच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन प्रमाणेच नारायणगाव पोलिस स्टेशन जिल्हा पुणे येथेही गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदिप मिटके यांच्या सूचनेनुसार श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या