ब्रॉडकास्ट जर्नालिझममध्ये करिअर ची उत्तम संधी

 




पुणे- 

ब्रॉडकास्ट जर्नलिस्टची भूमिका म्हणजे माहितीचे चलतचित्र आणि ध्वनीमध्ये रूपांतर करणे, लाइव्ह किंवा रेकॉर्ड केलेले पॅकेज रिपोर्ट करणे, तयार करणे तसेच बुलेटिनचे संशोधन करणे, तयार करणे आणि वाचणे होय.

ब्रॉडकास्ट जर्नालिझममध्ये पत्रकाराची पहिली वचनबद्धता ही शुद्धता किंवा अचूकता याच्याशी संबंधित असते. ब्रॉडकास्ट पत्रकाराने जे काही केले ते अचूक घटना सांगण्यासाठी योगदान असले पाहिजे. बहुतेक बातम्या विश्लेषक, पत्रकार आणि वृत्तपत्र, वेबसाइट, मासिक प्रकाशकांसाठी, टेलिव्हिजन अथवा रेडिओ प्रसारणासाठी काम करतात. बहुतेक पत्रकार पूर्णवेळ काम करतात आणि त्यांचे वेळापत्रक कामानुसार बदलत राहते. मुद्रित पत्रकारिता लिखित स्वरूपात सादर केली जाते; ती वर्तमानपत्रे, मासिकांमध्ये दिसते. त्यात चित्रे किंवा आलेख समाविष्ट असले तरी, मुद्रण पत्रकारिता वाचण्याचा निराळा हेतू असतो. प्रसारित पद्धतीने केलेली पत्रकारिता ही टेलिव्हिजन, रेडिओ किंवा इंटरनेटवर व्हिडिओ अथवा ऑडिओद्वारे सादर केली जाते.


ब्रॉडकास्ट जर्नालिझममध्ये करिअर करताना प्राप्त होत असलेल्या संधींमुळे ते नक्कीच नावीन्यपूर्ण आणि आनंददायी करिअर बनते. या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना होणारा फायदा म्हणजे मुलाखतीची संधी, तसेच त्या मुलाखतीचे प्रसारण हे एक आव्हानात्मक आणि स्पर्धात्मक क्षेत्र असते. परंतु तरीही ते अत्यंत फायद्याचे, परिपूर्ण असू शकते. ब्रॉडकास्टिंगचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव देणारे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम शोधले पाहिजेत. अनेक विद्यापीठे विद्यार्थ्यांना विद्यार्थी-निर्मित रेडिओ आणि टेलिव्हिजन स्टेशन्समध्ये वास्तविक जगाचा अनुभव देतात. तो अनुभव व्यक्तिमत्त्वाला परिवर्तन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.


अभ्यासक्रमातील प्रत्येक क्षण विलक्षण


भाषणांचे प्रक्षेपण माहितीपट तयार करणे


मुलाखती घेणे जाहिरातीचे निवेदन


दैनंदिन बातम्या देणे व्हॉइस कल्चर


आर्थिक विषयांवरील कार्यक्रम निर्मिती करणे


शेअर बाजाराच्या संबंधी बातमीपत्र सादर करणे


स्टेजिंग, कॅमेरा अँगल लाइट, कॅमेरा, अॅक्शन


टेलिप्रॉम्पटरच्या उपयोगातून बातम्या सादर करणे


कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे


बातमीपत्र तयार करणे त्याचे संपादन करणे


लाइव्ह बातम्यांचे सादरीकरण करणे


स्टुडिओमधील तंत्रज्ञानाची माहिती करून घेणे


उपग्रहासारख्या व्यावसायिक टेलिव्हिजन ट्रान्समिशन प्लॅटफॉर्म वापरण्यापेक्षा वेबकास्टिंग सामग्री आर्थिक दृष्ट्या स्वस्त आणि म्हणूनच रास्त वाटत असते. परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी एका विशिष्ट व्यक्तिमत्त्वाची जरुरी असते. हजरजबाबीपणा, चाणाक्षपणे प्रत्येक विषय, चर्चा हाताळणे, वेळेच्या मर्यादांचे भान, ब्रॉडकास्ट जर्नालिझम हे बातम्या आणि जर्नल्सचे क्षेत्र आहे, जे जुन्या पद्धतींऐवजी इलेक्ट्रॉनिक पद्धतींद्वारे प्रसारित केले जाते, त्यामुळे व्यापक स्वरूपात त्याचे प्रसारण होते, अनेकांपर्यंत ते सहज आणि त्वरित पोहचू शकते.


ब्रॉडकास्ट जर्नालिझममधील नोकरीच्या / कामाच्या संधी


ब्रॉडकास्ट पत्रकार न्यूज कॉपीराइटच


न्यूजकास्ट संचालक टेलिप्रॉम्प्टर ऑपरेटर


व्हॉईसओव्हर कलाकार व्हिडिओ एडिटर


फील्ड निर्माता संशोधक/शोध पत्रकार


टीव्ही न्यूज रिपोर्टर टीव्ही वृत्त छायाचित्रकार


टीव्ही स्टुडिओ बातम्या निर्माता


टीव्ही न्यूज अँकर टीव्ही असाईन्मेंट संपादक


व्हिडिओ ग्राफिक्स एडिटर


टीव्ही स्पोर्ट््‌स रिपोर्टर टीव्ही स्पोर्ट्स फोटोग्राफर


स्वत-चा यु ट्यूब न्यूजचॅनेल चालवणे


न्यूज स्टोरीज व्हिडिओद्वारे तयार करून देणे


आवश्यक कौशल्य


उत्कृष्ट बातम्या गोळा करणे आणि रिपोर्टिंग


स्पष्ट आणि व्यावसायिक प्रसारणासाठी आवाज


मन वळविण्याची पद्धत


लोकांकडून माहिती काढण्याची क्षमता


बातमी, विषय कशासाठी बनवायची आणि ती विशिष्ट प्रेक्षकांसमोर कशी सादर करायची याची पूर्वतयारी करणे, त्याची प्रेक्षकांना अनुभूती देणे


उत्कृष्ट लेखनकौशल्य आत्मसात करणे


एखाद्या चित्राची किंवा प्रतिमेची भावना व्यक्त करण्यात मदत करण्यासाठी ध्वनी महत्त्वपूर्ण आहे. त्याअनुषंगाने त्याला पार्श्वसंगीत, व्हॉईसओव्हर देणे आवश्यक असते. ब्रॉडकास्ट मीडियामध्ये कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच जाहिरात करणाऱ्या ब्रँडसह ग्राहकांना ते अधिक सोईस्कर वाटते.


ब्रॉडकास्ट जर्नालिझमच्या अभ्यासक्रमात मायक्रोफोन, रेकॉर्डिंग उपकरणे आणि इतर उपकरणे कशी चालवायची हे शिकायला मिळते. बातम्या संपादित करणे, त्यांची निर्मिती करणे किंवा निर्देशित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक बाबी शिकायला मिळतात. ब्रॉडकास्ट जर्नालिझममधील विद्यार्थी रेडिओ, टीव्ही आणि इतर प्रसारमाध्यमांसाठी बातम्यांचा अहवाल देणे, निर्मिती करणे आणि वितरित करणे शिकतात. रेडिओ, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ/फिल्म माध्यमांद्वारे बातम्या आणि बातम्यांचे कार्यक्रम अहवाल, निर्मिती आणि वितरित करण्याच्या पद्धती आणि तंत्रांवर लक्ष केंद्रित करणारा कार्यक्रम; आणि ते व्यक्तींना व्यावसायिक पातळीवर प्रसारण करण्यासाठी पत्रकार, संपादक, निर्माते, दिग्दर्शक आणि व्यवस्थापकपदी कार्यरत होण्यासाठी सक्षम करतात.


शिक्षण देणाऱ्या प्रथितयश संस्था -


एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझम, चेन्नई


पत्रकारिता आणि जनसंवाद विभाग, टीएमव्ही, पुणे


इंडिया टुडे मीडिया इन्स्टिट्यूट, नोएडा, उत्तर प्रदेश


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, अहमदाबाद


मीडिया आणि कम्युनिकेशन स्टडीज विभाग, एसपीपीयू, पुणे


सीमेडू स्कूल ऑफ प्रो-एक्सप्रेशनिझम, पुणे


कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकादमी, पुणे आणि नागपूर


स्कूल ऑफ मीडिया अॅक्टिव्हिटी, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (फक्त महिलांसाठी), पुणे


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझम अँड न्यू मीडिया, बंगळूर, कर्नाटक


स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अँड कम्युनिकेशन, मुंबई


एमआयटी इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिझम, पुणे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या