Breaking News

कात्रज भागात ज्येष्ठ महिलेचा गळा आवळून खून

 


पुणे : कात्रज भागात मोलमजुरी करुन एकट्या राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना उघडकी आली. ज्येष्ठ महिलेकडील दागिने लांबवून चोरटा पसार झाला.

पारुबाई किसन सावंत (वय ६५, रा. मेनका स्टोन कंपनीजवळ, भिलारेवाडी, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ शहाजी मारुती चंदनशिवे (वय ६०, रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुखा बिंदा (रा. मेनका स्टोन कंपनीजवळ, भिलारवाडी, कात्रज) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाजी चंदनशिवे आणि पारुबाई सावंत शेजारी राहायला आहेत. पारुबाई मोलमजुरी करुन एकट्या राहात होत्या. आरोपी सुखा बिंदा तेथे रखवालदार म्हणून काम करत होता. त्याने पारूबाई यांचा गळा आवळून खून केला. दागिने तसेच पेटीतील रोकड चोरून तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी सुखा बिंदा आणि त्याची पत्नी पसार झाली असून गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करत आहेत.

No comments