“टरबूज हे आरोग्यासाठी चांगले… पण शिंदे”; ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हरेच्या ‘या’ पोस्टपेक्षा नेटकऱ्यांच्या कमेंट चर्चेत


छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या पर्वातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांमध्ये एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यातील एक अभिनेता म्हणजे पराग कान्हेरे. पराग हा ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. तो एक प्रसिद्ध शेफ आहे. सध्या तो त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

परागने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “I just love the melon (टरबूज)salad.. no matter how much people criticize.. melon (टरबूज) is good for health.. सवयी बदला, जीवन बदलेल,” अशी पोस्ट परागने केली आहे. या पोस्टमध्ये पराग थोडक्यात म्हणाला, “तुमचे स्वागत. मला टरबूज हे सलाड म्हणून खूप आवडतं. भलेही लोकं त्याला कितीही नावं ठेवोत. पण टरबूज हे आरोग्यासाठी चांगले असते.”

परागची फेसबूक पोस्ट राजकीय असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. ते सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एक नेटकरी परागच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, “अरे पराग भाव…आता टरबूजाबरोबर ..प्रताप सरनाईक वगैरेंची काकडी पण आहे रे तुला सैलैड म्हणून खायला.” नेटकऱ्याच्या कमेंटवर उत्तर देत पराग म्हणाला, “हाहा…भावा, रेसीपी बनवावी लागेल… सलाड कुठला पण असू दे…ड्रेसिंग त्याचं शिंदेच असणार.” दुसरा नेटकरी म्हणाला, “सगळं सोडायचं आहे, फक्त NCP & Congress ला सोडायचं नाहीये.” तिसरा नेटकरी म्हणाला, “शेफ पण आज काल बाजारात चांगले टरबूज नाहीत.” त्यावर उत्तर देत पराग म्हणाला, “बघून घ्यायचे नीट…विकणाऱ्यावर विश्वास न ठेवता.”

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्ता स्थापन केली. गेल्या महिन्यात महाविकासआघाडी सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. त्यावेळी आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचे आमदार फुटल्याने त्यांना २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या