देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतराबाबत अमृता फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाल्या, “कधीकधी ते रात्री…”


राज्यात मागील काही काळात प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडल्या आणि थेट सत्तातरण होऊन महाविकासआघाडीच्या जागेवर शिंदे-फडणवीस सरकार आलं. नेमकं पडद्याआड काय घडामोडी झाल्या याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातील काही भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात सांगत रात्रीच्या गुप्त भेटींचा उल्लेख केला. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फडणवीसांच्या वेशांतराबाबत वक्तव्य केलंय. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “देवेंद्र फडणीस सामान्यपणे खूप उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे मला जास्त लक्षात आलं नाही, पण कधीकधी ते चष्मा व हुडी घालून बाहेर पडायचे. ते असे दिसायचे की मलाही ओळखू यायचे नाही. मी त्यांना असं एवढ्यात नवीन काय सुरू आहे असं विचारलं. ते उत्तर देणं टाळायचे. मला तरी काही ना काही चालू आहे असं वाटायचं.”

एकनाथ शिंदे यांचं भाषण सर्वांनी ऐकलं. त्यातून त्या पक्षाच्या सर्वच लोकांमध्ये किती अस्वस्थता होती ते लक्षात येतं. विशेषतः आमदार व कार्यकर्त्यांमध्ये ही अस्वस्थता होती. ती कुठे ना कुठे निघणार होती. त्याला जागा देण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्या आमदारांच्या अडचणीत त्यांच्या मागे उभं रहायचा निर्णय भाजपाने घेतला आणि तो चांगलाच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या