नवरात्र उत्सवासाठी नियमात बदल होण्याची शक्यता, उपमुख्यमंत्र्यांचे संकेत !

 



मुंबई : राज्यात नवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. यासाठी सुरुवातीचे दोन दिवस बारे वाजेपर्यंत कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण उर्वरित दिवसांसाठी देखील ही मुदत वाढवण्याची मागणी लोकांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. 

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "नवरात्रीत दोन दिवस आम्ही बारा वाजेपर्यंत परवागनी दिली आहे. त्यानंतर एक दिवस वाढला पाहिजे असा प्रस्ताव आम्ही गृहमंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहोत, त्यावर अंतिम निर्णय मख्यंमत्री घेतील"

राज्यात आजपासून नवरात्रीला सुरु झाली आहे. पुढील नऊ दिवस जनतेमध्ये याचा उत्साह असेल दरम्यान, पुजाअर्चेसह गरबा-दांडिया अशा विविध कार्यक्रमाचं या नऊ दिवसांमध्ये आयोजन केलं जातं. प्रामुख्यानं रात्रीच्या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमांना सुरुवातीचे दोन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

पण पुढील दिवसांपर्यंतही रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या मागणीवर सकारात्मक विचार करुन परवानगीबाबत विचार करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या