सोन्याची शुद्धता कशी तपासावी? जाणून घ्या सोन्याचे नवे दर

 





सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.


कालच्या तुलनेत आज सोनेच्या दरामध्ये अंशतः घट झाली असून चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कालप्रमाणेच आजही २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६,३९० प्रति १० ग्रॅम आहे. काल सोन्याची किंमत ४६,७५० रुपये इतकी होती. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदीचे कालचे दर ५६,४०० रुपये होते. आज चांदी ५७,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,३९० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,६१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,४२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७० रुपये आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या